logo
ADVERTISEMENT
home / Bollywood
अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र

अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र

चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शक एकता कपूर नीना गुप्ता आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीसोबत एक नवा चित्रपट तयार करत आहे. एकताने नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘गुडबाय’ असून यात पहिल्यांदाच नीना गुप्ता  बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका यात नीना गुप्ता साकारणार आहेत. अमिताभ बच्चन नीना गुप्ता यांचे बधाई हो या चित्रपटातील काम पाहुन खुपच प्रभावित झाले होते. 2018 मध्ये या चित्रपटातील कामाचे कौतुक करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी नीना गुप्तांना एक नोट लिहिली होती. ज्यात त्यांनी त्यांचे खूप कौतुकही केले होते. 

गुडबायच्या शूटिंगला सुरूवात

बालाजी टेलिफिल्म आणि रिलायंस इंटरटेंटमेंट गुडबायची निर्मिती करत आहे. विकास महल या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत. आधी या चित्रपटात अमिताभ बच्चन आणमि रश्मिता मंदाना मुख्य भूमिकेत आहेत असं जाहीर करण्यात आलं होतं. आता या चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये नीना गुप्ता यांचे नावही जोडले गेले आहेत. गुडबायचे शूटिंग सुरू झालं असून लवकरच चाहत्यांना ही नवी जोडी पतीपत्नीच्या रूपात पाहायला मिळणार आहे. कोविडच्या वाढत्या केसेसमुळे गुडबायच्या शूटिंगसाठी संपूर्ण चांदीवली स्टुडिओ बुक करण्यात आलेला आहे. ज्यामुळे पूर्ण सुरक्षेची काळजी घेत या चित्रपटाचं शूटिंग करण्यात येत आहे. अमिताभ बच्चन  आणि रश्मिता मंदाना यांचे काही सीन्स शूट देखील झाले आहेत. गुडबायच्या निमित्ताने विकास बहलदेखील पुन्हा एकदा एकता कपूरसोबत काम करणार आहेत. यापुर्वी विकास बहल यांनी ‘लुटेरा’ आणि ‘उडता पंजाब’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकता आणि विकासच्या गुडबायची जादू आता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

नीना गुप्ता या चित्रपटात काम करण्यास उत्सुक

नीना गुप्ता यांनी अमिताभ बच्चन  यांच्यासोबत यापूर्वी कधीच काम केलेलं नाही. त्यामुळे रूपेरी पडद्यावर ही फ्रेश जोडी एकत्र पाहण्यास चाहते नक्कीच उत्सुक आहेत. नीना गुप्तादेखील या चित्रपटात काम करण्यास खूपच उस्ताही झाल्या आहेत. त्यांनी याबाबत शेअर केलं की, “जेव्हा त्यांना या चित्रपटाची ऑफर मिळाली तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला. कारण ही एक अद्भूत आणि रोमांचक स्क्रिप्ट आहे असं त्याचं म्हणणं आहे. जेव्हा स्क्रिप्ट चांगली असते तेव्हा मी इतर कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. यातील माझे पात्र खूपच सुंदर पद्धतीने लिहिलेले आहे. शिवाय या निमित्ताने मला पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळणार आहे. ज्यासाठी मी खूपच उस्ताही आहे. माझं एखादं स्वप्न पूर्ण व्हावं असा आनंद मला आता झाला आहे.” नीना गुप्ताने यापूर्वी एकताच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातही काम केलं होतं आणि गुडबाय हा एकतासोबत त्यांचा दुसरा चित्रपट आहे.  ज्यामुळे आता एकताचा गुडबाय प्रेक्षकांना किती आवडतो हे पाहणं उत्कंठा वाढवारं ठरणार आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले करणार ‘मेरे साई’ मध्ये भूमिका

लंडनमध्ये चमचमीत वडापाव आणि पावभाजीवर अमृता-पुष्करने मारला ताव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ‘रॉकेट्री’चं कौतुक, आर माधवनसोबत पाहिली झलक

ADVERTISEMENT
06 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT