लग्न म्हटले की, नववधूसाठी काही खास ब्रँड आणि डिझायनरचे लेहंगे घेण्याचा विचार खूप जण करतात. मनीष मल्होत्रा, सब्यसाची, कल्की, अनिता डोंगरे अशा काही फॅशन डिझायनरची नावे प्रकर्षाने पुढे येतात. काही चित्रपटांमध्येही ‘मै लेहंगा पेहनुंगी तो सिर्फ मनिष मल्होत्रा का’ असे डायलॉगही खूप जणांच्या तोंडी ऐकले आहेत. पण आता अशाच एका ब्रँडच्या नव्या कलेक्शवर खूप जणांना नेमकं काय बोलावं कळेनासं झालं आहे. या साडीची किंमत आणि साडीचा प्रकार पाहून खूप जणांनी ही साडी माझ्या आजीच्या साडीपेक्षा ही चांगली असूच शकत नाही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घेऊया ही साडी आहे तरी काय आणि काय आहे याचे वेगळेपण
साडीची किंमत आणि पॅटर्नवर चर्चा
ब्रायडल लेहंग्यासाठी सब्यसाची हा ब्रँड फारच प्रसिद्ध असा ब्रँड आहे अनेक सेलिब्रिटी आणि ब्राईड्सने या ब्रँडचे लेहंगे आतापर्यंत परिधान केलेले आहेत. पण सब्यसाचीने काही नवे साडी कलेक्शन त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवर शेअर केले आहेत. एका मुलीने पिच पिंक रंगाचा टॉप आणि त्यावर तशीच साडी नेसली आहे. ही साडी त्यावर सब्यसाचीचा बेल्ट आणि कंबरेला बॅग लावण्यात आली आहे. या मॉडेलने हातात एक काळ्या रंगाची क्लच घेतली आहे. ही साडी पाहून कोणालाच काही नवीन आहे असा देखील भास होणार नाही. ही साडी पाहूनच खूप जणांनी या साडीवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. आता या साडीची किंमत ऐकून तुम्हालाह धक्का बसेल कारण ही साडी चक्क 9999/- इतक्या किंमतीची आहे. या साडीची किंमतच खूप जणांना मुळीच पटली नाही. त्यामुळेच की काय ही साडी आता सगळ्या सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली आहे. अशी साडील 70 च्या काळात माझ्या आजीकडे होती. पण ही साडी आज किडनी विकण्याच्या भावात मिळत आहे याचे आश्चर्य आहे. तर काहींनी अशी हुबेहूब साडी माझ्या आजीकडे होती अशा प्रतिक्रिया दिली आहे.
महागडा पण नाही आवडला प्रकार
फॅशन इंडस्ट्रीमध्ये काहीतरी नवीन करायला जाताना कपड्यांवर असे प्रयोग नक्कीच केले जातात. पण असे प्रयोग करताना त्यांच्या किंमती ऐकून अनेकांना नेहमीच धक्का बसतो. अशीच ही साडी असल्यामुळे कदाचित ती कोणालाही पटलेली नाही. यापेक्षा अनेक वेगळ्या ब्रँडच्या साड्या या उत्तम असतात असेच या सगळ्या प्रतिक्रियांमागील उद्देश आहे. इतकेच नाही तर फॅशनच्या नावाखाली काहीही विकले जात आहे असी प्रतिक्रिया देखील यामधून उमटताना दिसत आहे. तुम्हाला ही साडी पाहून कोणाची आठवण झाली?
किमंतही महत्वाची
एखादी ब्रँडेडसाडी किंवा काही तरी डिझायनर आपल्याकडे असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळेच या डिझायनर्सना कॉपी करण्याचा प्रयत्न खूप जण करतात. पण त्यांना कॉपी करताना जर त्यांनी असे कलेक्शन आणले तर त्यांच्यावर टीका अधिक होऊ लागतात.आता सब्याच्या या साडीवर अशाच काही प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात साडीची किंमत ऐकून तर खूप जणांना चांगलाच धक्का बसला आहे.
आता तुम्हाला या विषयी काय वाटते आम्हाला नक्की सांगा
अधिक वाचा
गौहर खान करणार पहिल्यांदाच पती झैदबरोबर स्क्रिन शेअर
करिना कपूर झाली निर्माती, लवकरच तयार करणार थ्रिलर चित्रपट
Read More From Entertainment
Influencer Aashna Shroff Ties the Knot with Armaan Malik, The Pictures Scream Love
Vedika Negi