अभिनेता सुशांत सिंह राजपूतला जाऊन एक महिन्याहून अधिक काळ होऊन गेला.पण अद्यापही सुशांतच्या मृत्यूवरुन अनेकांना संशय आहे. त्याने आत्महत्या केली नसावी तर त्याचा खून झाला असावा असा दावाच अनेकांनी केला आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी महिन्याहून अधिक काळ होऊनही केली जात आहे. सुशांततर गेला पण तो मागे इतके प्रश्न सोडून गेला आहे की, अनेकांना आजही स्वस्त बसता येत नाही. त्याने असे का केले असावे हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात घर करुन बसला आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या फॅन्सनी सतत सुशांत सिंह राजपूतच्या नावाने तगादा लावला आहे. आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम पॅरानॉर्मल एक्सपर्ट स्टीव हफने केले आहे. त्याने थेट सुशांतच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. सुशांतनेही स्टीवनने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे.
मिलिंद सोमणने शेअर केला शर्टलेस फोटो, कियाराशी होत आहे तुलना
काय म्हणाला सुशांत ?
स्टीव हफने केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याने आत्म्याशी संवाद साधण्याची विकसित केलेली एक मशीन दिसत आहे. त्या मशीनद्वारे तो सुशांतशी संवाद साधताना दिसत आहे. सुशांतला अगदी पहिला प्रश्न विचारला की, तो कुठे आहे त्या ठिकाणी उजेड आहे का? त्यावर त्याचा अगदी हलका आवाज ऐकू येतो. सुशांतला त्याने आत्महत्या का केली असा प्रश्न ज्यावेळी विचारण्यात आला त्यावेळी मात्र त्याने त्याला उत्तर दिले ‘बदल’. त्यामुळे यातून काहीच स्पष्ट होत नाही. त्यामुळे स्टीवने सुशांतशी आणखी एकदा बोलण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये त्याला तुला आत्महत्या करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले असे विचारण्यात आले त्यावेळी त्याने, त्या व्यक्ती खूप संरक्षणात आहेत असे सांगितले. त्यातूनही फार काही निष्पन्न निघाले नाही. त्यावेळी त्याने एक आणखी तिसरा व्हिडिओ केला. ज्यामध्ये त्याने त्याच्या आईचा उल्लेख केला. मी माझ्या आईसोबत आहे, असे सांगितले. शिवाय त्याच्या बोलण्यामध्ये सुसुत्रता नव्हती असेही दिसत होते. त्यामुळे स्टीव यांनी या सेशननंतर स्टीवने या बाबतीत एक खुलासा केला, त्याने सांगितले की, आत्मा या कधीही मृत्यूबाबत फार स्पष्ट बोलत नाहीत.त्यामुळेच अनेकदा काही गोष्टी कळत नाही. पण त्याने यामध्ये प्रेम हवे असाही उल्लेख केला आहे. आत्महत्या संदर्भात त्याने गळा पाहा असाही एक हिंट दिला आहे. हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर अधिक चांगले कळेल.
कोण आहे स्टीव हफ?
जर तुम्ही आज पहिल्यांदाच सुशांतच्या निमित्ताने स्टीव हफचे नाव ऐकले असेल तर स्टीव हा पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीवर विश्वास ठेवणारा आहे. स्टीवने या पूर्वीही अनेक सेलिब्रिटींच्या आत्म्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय त्याने अनेक पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीवर व्हिडिओ केले आहेत. स्टीव हा एक युट्युबर आणि ब्लॉगर आहे. त्यामुळे तो सतत व्हिडिओ पोस्ट करत असतो. जे भूत, आत्मा यांच्याशी निगडीत असतात. पण तो एक घोस्ट हंटर नाही तर तो रिसर्चर आहे असे तो सांगतो. त्याच्या दृष्टिकोनातून शरीर मरते पण आत्मा नाही. त्याने खास या आत्माशी बोलण्यासाठीच एक मशीनही तयार केली आहे. त्याला तो बॉक्स असे म्हणतो. या शिवाय तो एक फोटोग्राफर आहे.
किंग खानला वाटतेय कोरोनाची भीती, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी उचललं ‘हे’ पाऊल
ठेवायचा का विश्वास?
हल्ली सोशल मीडियावर इतके व्हिडिओ असतात की, त्यातील खरे खोटे व्हिडिओ कोणते हे शोधणेही फार कठीण असते. अनेक व्हिडिओ हे फक्त पैसे कमावण्यासाठी केले जातात.त्यामुळे हा व्हिडिओ खरा की खोटो याची शाश्वती आम्ही ही देऊ शकत नाही. पण सुशांतचा आवाज ऐकल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला असेल हे मात्र नक्की!
टीव्ही जगत गाजवलेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री सध्या आहेत गायब
Read More From Bollywood
Astrologer Predicts Divorce for Aishwarya-Abhishek & Sonakshi-Zaheer, But Is It Really Necessary?
Isha Jain
Not Laapataa Ladies! This Hindi Film Surprised Everyone By Making It To The Oscars Shortlist
Isha Jain