Bollywood

सोहेल आणि अरबाज खान अडचणीत, या कारणामुळे दाखल झाली FIR

Leenal Gawade  |  Jan 4, 2021
सोहेल आणि अरबाज खान अडचणीत, या कारणामुळे दाखल झाली FIR

इंडस्ट्रीत खान ब्रदर्सची नेहमीच चर्चा असते. त्यांचे काम, त्यांचे अफेअर्स आणि सामाजिक जीवन कायमच सगळ्यांसमोर येत असते. यातील काही गोष्टी या चांगल्या पद्धतीने दाखवल्या जात असल्या तरी आता खान ब्रदर्सपैकी सोहेल आणि अरबाजवर FIR दाखल करण्यात आली आहे. त्याचे कारण हिंसा नसून कोरोनाच्या नियमांचे पालन न करणे हे आहे. जगात सगळीकडे कोरोनाचे संकट आहे. त्यातून आता बाहेर पडलो अशी अनेकांनी धारणा असली तरी देखील सगळीकडे आजही काळजी घेतली जात आहे. पण अरबाज खान, सोहेल खान आणि त्याचा मुलगा निर्वाण खान या तिघांनी कोरोना महामारीला हलक्यात घेऊन असे काही कृत्य केले की, त्यांच्याविरोधात पालिकेला सक्त कारवाई करावी लागली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊया.

बॉलीवूडच्या या अभिनेत्री आहेत यशस्वी बिझनेस वुमन

नियमांचे केले उल्लंघन

Instagram

अरबाज, सोहेल आणि त्याचा मुलगा निर्वाण हे 25 डिसेंबरला UK ला गेले होते. परदेशात जाताना ज्या प्रमाणे नियम आहेत. तसेच देशात परतल्यानंतरही आहे. परदेशात अनेक ठिकाणी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक लॉकडाऊन आणि नियम करण्यात आले आहेत. हे तिघे मुंबईत परतल्यानंतर त्यांना मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईन राहणे हा सगळ्यांसाठीच नियम करण्यात आला आहे. पण असे असून देखील नियमांची पायमल्ली करत या तिघांनी हॉटेलमधून बाहेर पडत थेट आपले बांद्र्यामधील घर गाठले. जे इतरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही घातक आहे. पण हे सगळे माहीत असूनही या खान ब्रदर्सनी याची परवा न केल्यामुळेच पालिकेला काही अॅक्श घेणे गरजेचे होते. त्यानुसार त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

परदेशातून अनेक कलाकार परत

लॉकडाऊन जगभरात शिथिल झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी परदेशवाऱ्या करायला सुरुवात केली आहे.  अनेकांनी नियमांचे पालन करत हा प्रवास सुरु केला आहे. पण देशातून बाहेर जाताना आणि येताना काही गोष्टींची काळजी नागरीक म्हणून करणे फारच गरजेचे आहे. काही जणांनी आतापर्यंत या नियमांना काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही सेलिब्रिटींनी या नियमांना बासनात गुंडाळून ठेवलेले ही दिसू आले आहे. अभिनेता किंवा अभिनेत्री हे काहींचे आयडॉल असतात. पण अशा पद्धतीने जबाबदार नागरिक असूनही कलाकार असे वागत असतील तर त्यांनी योग्य ती काळजी घेणे फारच गरजेचे आहे. 

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या सात महिन्यांनंतर दिसली रिया चक्रवर्ती

पालिकेची करडी नजर

परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर पालिकेची करडी नजर आहे. कोरोनाचा नवा प्रकार ब्रिटनमध्ये थैमान घालत आहे. अशामुळे परदेशातून येणाऱ्या  लोकांवर लक्ष देणे फारच गरजेचे आहे. भारतात कोरोनाची संख्या सुदैवाने कमी झाली आहे. पण तरी देखील काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर अशापद्धतीने कडक कारवाई केली जाणार आहे हे नक्की!

सध्या तरी सोहेल आणि अरबाज यांच्यावर टांगती तलवार आहे. त्यांना नक्की कशापद्धतीने याचा दंड बसणार हे कळेलच

नव्या वर्षात नव्या चित्रपटांचा धमाका, होणार लवकरच प्रदर्शित

Read More From Bollywood